Thursday, April 2, 2009

विद्यापिठ आणि पांडूशौक

मला सांगा विद्यापीठात पानपट्टी का नाही????
मी परवा काही कामानिमित्त पुणे विद्यापीठात गेलो होतो (हो आमच्यासारख्यांनाही विद्यापीठात कामे असतात).
साला संध्याकाळची वेळ होत आली होती...५:४५ किंवा ६ वगैरे वाजत आले होते. अश्यावेळी आमच्या सारख्या रंगित माणसांना कश्याची आठवण येणार नक्कीच शुभंकरोतीची नाही.....जिथे अश्या कातर वेळी आमच्या कानात घुंगरे झुण-झुण करु लागतात. किंवा तथाकथित धार्मिकांना टाळ मृदुंगाचा नाद कानी येतो.... बर्याचश्या पेशनर लोकांना बातम्या.......
असो.........त्या वेळी आम्हा लोकांना पानाची खासकरुन त्या कुठल्यातरी दिवशी रंगलेल्या पानाची आठवण येते... ते पिचकार्याचे विशिष्ट आवाज. रसिक लोकांनी काढलेल्या त्या रक्तवर्ण सुर्याचे ते पानपट्टी समोरील चित्र पाहुन आम्हांला भरभरुन येते हो... अश्या त्या पानसाम्राज्याचे वर्णन ते काय करावे.??? आम्ही नेहमी अश्या त्या पान साम्राज्यात रंगणारे लोक... आणि त्या दिवशी काय सांगावे काय तो अभद्र दिवस?? अहो एकतर सकाळ पासुन एक विडा सुध्दा नाही... काम काम आणि फ़क्त काम चालले होते.. शिवाय माझ्या कडची तंबाखु संपलेली. माणिकचंद आर.एम.डी. मी बंद केले आहे. आणि गोवा मला आवडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे जवळ जवळ एक आठवडा झाला घश्याला जि कोरड पडलेली होती ती तशीच होती म्हणजे....आपल्याच प्यांटच्या चेनमध्ये आपल्याच लवडयाला चिमटा बसल्यावर होते तशी (हो काही लोकांचे सगळेच दुसर्याचे असते म्हणुन उल्लेख केला आपलेपणाचा असो......) काहीशी स्थिती झालेली होती....विद्यापिठ आवारात प्रवेश केला आणि माला मोठी तल्लफ़ आली चला पान खाऊयात.. च्यायला विद्यापिठात कसले आलेय पान साला लिमलेटची गोळी मिळत नाही तिथे...मी आपले माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणुन सगळ्या टपर्या शोधुन शोधुन विचारुन पाहिले.. कुणाकडेही साधा तंबाखुची पुडी सुध्दा नव्हती हो....वाट लागली मग तिच्या आयला...डोके चालणार कसे हो आमचे??? मग काय माझ्या मित्राला म्हणले चल रे बास झाली तुझी विद्याराधाना निघु आत्ता. आणि आम्ही निघालो अरे अरे अरे औंधचा नाका येई पर्यंत एकही पानाचे दुकान नाही अतिशय वाईट वाटले ...डोक्यात मुंग्याचे वारुळ फ़ुटले..
अरे विद्यापिठात पानपट्टी नाही म्हणजे काय? भेनच्योत अविवाहित तरुणांचीच नसबंदी केल्यासारखे नाही काय हे ? आपल्याला नाही पटले. श्रीयुत पुलं नी वर्णन केलेली 'ती' पानपट्टी म्हणजे काय? अहाहा काय वर्णावे ते वैभव अशीच होती...आताही आहेत काही पानाची दुकाने तशी पण कमीच. म्हणजे बोटावर मोजण्यासारखी. पण मला आता वाटू लागले आहे ''समर्थ भारत'' राबविण्या आधी आपल्या कुलगुरुंनी आपल्या विद्यापिठात निदान एकतरी पानपट्टी उघडावी...क्रांतिसुर्याचा एवढा लाल भडक प्रचार कदाचित दुसर्या कुठल्याने शक्य होईलसे मला वाटत नाही.