Monday, February 9, 2009

''समाजमान्यता''

कधी मिळते आणि का मिळते एखाद्या गोष्टीला मला कोणी सांगेल????
१) मला तर कधीच कळले नाही, हुंडा, सतिप्रथा, बालविवाह, वैश्याव्यवसाय, जातिभेद, वर्णभेद, रुढी-परंपरा आणि काय आणि काय??
ह्याही गोष्टी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर समाजमान्य होत्याच ना, ह्यांना कोण म्हणेल हो चांगल्या?? ज्यांना त्याचा फ़ायदा घेता आला तेच ना?
समाजात प्रत्येक गोष्ट ही अशीच असते, आपण प्रथमपासून गायी गुरे, शेळ्या, उंट, घोडे हे का पाळले?? ह्यांनाच का आपले गुलाम बनवले??
कारण हेच की त्यांचे दौर्बल्य, आपण त्यावर बोट ठेवले आणि त्यांना गुलाम बनवले,, नाहीतर आपल्याला काय वाघीणीचे दूध पचले नसते?की सिहींण?
आपण गुलाम बनवले आपल्याला राज्य गाजविता येईल अश्या प्राण्यांवच, त्याच प्रमाणे समाजात समाजमान्यता अश्यच बाबींना मिळते जी बाब सबळ लोक प्रस्तूत आणि प्रसारित करतात, ज्यांचे संख्याबळ किंवा, समाजातिल प्रस्थापितांमध्ये कमी प्रतिचे स्थान आहे ते लोक आपली बाब समाजमान्य करु शकत नाहीत, जेव्हा संख्या वाढेल अथवा आपण लैंगिक अल्पसंख्यांकांचे बहुसंख्य होऊ तेव्हाच आपल्याला समाजमान्यता मिळेल असे मजला वाटते.

२) समाजधारणेच्या आड येणारी बाब :- खरेच आहे की समाजधारणेस ही बाब समस्या उभी करु शकते परंतु मला सांगा अश्या कित्येक बाबी आहेत की ज्या समाजधारणेस बाधा आणन्यारा बाबी आहेत समाजधारणेस संन्यास, सैनिकी जिवनशैली, वैश्यावृत्ती, अनेक कितीतरी बाधा आणर्यार बाबी आहेत. आपण त्या प्रत्येक व्यक्तिची वैयक्तिक निवड म्हणुन जरी स्विकारल्या तरीही त्यांमुळे त्यांची समाजधारणेस असलेली बाधकता कमी होत नाही.

३) लौटरी सारख्या गोष्टी :- धनप्राप्तिच्या अश्या कितीतरी मार्ग आहेत जे की gain without pain चे स्वप्न दाखवतात . त्यातुन खरेच किती जणांना आर्थिक फ़ायदा होतो हे ज्याचे त्यांनीच पहावे..

४) चेन मार्केटींग :- अरे काय हे स्वत: चुxx बनायचे आणि दुसर्याला बनवाचे की काय? चेन मार्केटींग ह्यांच्या कुणी असले धंदे शोधुन काढले मला माहित नाहि.. आणि त्याला समाज मान्यता मिळते त्यातुन जर कुणी श्रीमंत झाला तर आपण त्याला नावाजतो.
असो ही यादी बरीच मोठी जाऊ शक्ते पण मला तिकडे जायचे नाही आपला मुख्य विषयाकडे वळू अश्याप्रकारे अगदी टाकाऊ अश्या बाबींना आपण समाजात मान्यता मिळताना पाहू शकतो एवढेच नव्हे तर आपण [समाजाने] त्यांना डोक्यावर घेतले आहे.

या विरुध्द आपण समलिंगी संबंधांकडे पाहुयात.
१) हे संबंध पहिली बाब दोघांमध्येच होणार आहेत, जास्तित जास्त एक डझनभर असतील. त्यांतच ह्यांचे काही चेन मार्केटींग करणार नाहीत आणि ते अगदी शांतपणे आपली जिवन शैली जगत आहेत कुणालाही त्याचा त्रास नाही. समाजधारणेचा प्रश्न जिथे येतो तेथे लोकसंख्या कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि जर अश्याप्रकारे आम्हा लोकांनि जर असलेल्या अनाथ मुलांचा प्रश्न दत्तक घेऊन सोडवला. आणि बाकीच्यांनी एक किंवा एकवरच थांबवले तर समाज धारणा किती चांगली होईल??सगळेच प्रश्न सुटतील मुल दत्तक घेतल्याने समलिंगी लोक स्थिर अश्या दिर्घकालीन संबंधाकडे वळतील.. असे मला तरी वाटते. २) समलिंगी संबंधांकडे आपण काही समाजाची भले करणारी बाब म्हणुन पाहाणार नाही परंतू. प्रश्न असा आहे की समाजाचा भाग असलेल्या या घटकाला समाजा मधून बाहेर टाकायचे की समाजात ठेऊन त्यांना सामान्य म्हणुन स्विकारायचे . अर्थातच त्यांना समाजाने स्विकारावे.
३) परंतू जे काही आपण स्विकारतो त्याचा खरे तर पुर्नविचार व्हावा.
४) हे संबंध खर्या अर्थाने एक मानसिक निकड म्हणुन निर्माण होतात, आणि आपण त्याचे आर्थिक फ़ायदा(playboys), गरज म्हणुन(सैन्यदल), मानसिक विकृति(असू शकते), मानसिक/भावनिक गरजांतुन, समलिंगी संबंध निर्माण होतात.