Wednesday, May 13, 2009

काय आहे हे प्रकरण????

मी ही बर्याचदा विचार करत असताना हा विचार करायचो नक्की आहे तरी काय हे गे प्रकरण ???

Friday, May 1, 2009

सध्याचा उद्योग

सध्या मी एका विषयावर संशोधन करित आहे....
तो म्हणजे ””LGBT sexuality and Kundali'''

त्यासाठी जर तुम्ही मला मदत करणार असाल तर एकच काम करायचे......
तुमच्याकडे असलेल्या एखाद्या समलिंगी, किंवा ट्रांसजेंडरची
१) जन्म गाव
२) जन्म तारिख
३) जन्म वेळ मला कळवा..............

त्यांला त्याचे भविष्य मेलद्वारे कळविले जाईल (विनाशुल्क)

तर बिनधास्त कळवा......

Thursday, April 2, 2009

विद्यापिठ आणि पांडूशौक

मला सांगा विद्यापीठात पानपट्टी का नाही????
मी परवा काही कामानिमित्त पुणे विद्यापीठात गेलो होतो (हो आमच्यासारख्यांनाही विद्यापीठात कामे असतात).
साला संध्याकाळची वेळ होत आली होती...५:४५ किंवा ६ वगैरे वाजत आले होते. अश्यावेळी आमच्या सारख्या रंगित माणसांना कश्याची आठवण येणार नक्कीच शुभंकरोतीची नाही.....जिथे अश्या कातर वेळी आमच्या कानात घुंगरे झुण-झुण करु लागतात. किंवा तथाकथित धार्मिकांना टाळ मृदुंगाचा नाद कानी येतो.... बर्याचश्या पेशनर लोकांना बातम्या.......
असो.........त्या वेळी आम्हा लोकांना पानाची खासकरुन त्या कुठल्यातरी दिवशी रंगलेल्या पानाची आठवण येते... ते पिचकार्याचे विशिष्ट आवाज. रसिक लोकांनी काढलेल्या त्या रक्तवर्ण सुर्याचे ते पानपट्टी समोरील चित्र पाहुन आम्हांला भरभरुन येते हो... अश्या त्या पानसाम्राज्याचे वर्णन ते काय करावे.??? आम्ही नेहमी अश्या त्या पान साम्राज्यात रंगणारे लोक... आणि त्या दिवशी काय सांगावे काय तो अभद्र दिवस?? अहो एकतर सकाळ पासुन एक विडा सुध्दा नाही... काम काम आणि फ़क्त काम चालले होते.. शिवाय माझ्या कडची तंबाखु संपलेली. माणिकचंद आर.एम.डी. मी बंद केले आहे. आणि गोवा मला आवडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे जवळ जवळ एक आठवडा झाला घश्याला जि कोरड पडलेली होती ती तशीच होती म्हणजे....आपल्याच प्यांटच्या चेनमध्ये आपल्याच लवडयाला चिमटा बसल्यावर होते तशी (हो काही लोकांचे सगळेच दुसर्याचे असते म्हणुन उल्लेख केला आपलेपणाचा असो......) काहीशी स्थिती झालेली होती....विद्यापिठ आवारात प्रवेश केला आणि माला मोठी तल्लफ़ आली चला पान खाऊयात.. च्यायला विद्यापिठात कसले आलेय पान साला लिमलेटची गोळी मिळत नाही तिथे...मी आपले माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणुन सगळ्या टपर्या शोधुन शोधुन विचारुन पाहिले.. कुणाकडेही साधा तंबाखुची पुडी सुध्दा नव्हती हो....वाट लागली मग तिच्या आयला...डोके चालणार कसे हो आमचे??? मग काय माझ्या मित्राला म्हणले चल रे बास झाली तुझी विद्याराधाना निघु आत्ता. आणि आम्ही निघालो अरे अरे अरे औंधचा नाका येई पर्यंत एकही पानाचे दुकान नाही अतिशय वाईट वाटले ...डोक्यात मुंग्याचे वारुळ फ़ुटले..
अरे विद्यापिठात पानपट्टी नाही म्हणजे काय? भेनच्योत अविवाहित तरुणांचीच नसबंदी केल्यासारखे नाही काय हे ? आपल्याला नाही पटले. श्रीयुत पुलं नी वर्णन केलेली 'ती' पानपट्टी म्हणजे काय? अहाहा काय वर्णावे ते वैभव अशीच होती...आताही आहेत काही पानाची दुकाने तशी पण कमीच. म्हणजे बोटावर मोजण्यासारखी. पण मला आता वाटू लागले आहे ''समर्थ भारत'' राबविण्या आधी आपल्या कुलगुरुंनी आपल्या विद्यापिठात निदान एकतरी पानपट्टी उघडावी...क्रांतिसुर्याचा एवढा लाल भडक प्रचार कदाचित दुसर्या कुठल्याने शक्य होईलसे मला वाटत नाही.

Tuesday, February 10, 2009

एकदा काय होते

एकदा काय होते,,

ही स्टोरी कदाचित तुमची (sorry वाचणारे सगळेच gay नाहित) असू शकेल.

पण सध्या काय चालू आहे. ह्याचे एक मी चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे..

{वाचताना सावध राहा सगळे इतके पटकन घडते की तुम्हा आम्हा द्वापरयुगातल्या माणसांना ते कळतच नाही}
एखादा cutee महाविद्यालयात शिकणारा, १७ ते २३ वय जवानी ऎन जोषात. मुली आवडत नाहीत आसपासचे सगळे मित्र पोरी फ़िरविण्यात गंग, कोणी चालले डेट ला, कोणाचा आज कसा hot scene पोरीच्या कुठल्यातरी नातेवाईकाने कसा पकडला, कोणी आपल्या फ़टाकड्या तरुण मोलकरणीला कसे पटवले. ह्याच्या गप्पा चाललेल्या असताना. त्याला आठवण येते राव ??? आपले काही तरी वेगळे प्रकरण आहे. आपण इथे कूठेच बसत नाही. आपण काही वेगळेच विचार करतो. मला तो माझ्या वर्गातला गोट्या(एक काल्पनिक नाव) का आवडतो त्याचे ते पिळदार शरिर का मला मोहात पाडते मला कधी कळलेच नाही.

मग त्याला काहीतरी आठवते .पेपरमध्ये,कुठल्यातरी मित्राच्या तोडूंन एकलेले असअतेच. त्याची आठवण येते. पटकन net cyber cafe मध्ये जातो. एखाद्या orkut सारख्या social networking site वर आपले एक ऋतिक, शाहिद, उपेन चे उघडे नागडे चित्र जे तिथेच नेटवर कुठेतरी पैदा झालेले असते ते लावून आपल्या नावाशी मिळते जूळते एखादे नाव ठेऊन एक प्रोफ़ाईल उघडतो. जी वर आपली शरिराची मोजमापे, एखादा अर्धामुर्धा फ़ोटो अल्बमध्ये, सतराशे साठ videos टाकून एक gay profile तयार होते, आणि मग. खरी मजा चालू होते,,
आयुष्यात आपल्या एखाद्या चुलत, मामेभावा, बरोबरचा किंवा होस्टेल, किंवा क्लासमेटचा बरोबरचा एखादा hot अनुभव असतोच. त्यात आपण पाहातोच आहोत नेटवर किती तरी साईट मोठ्याप्रमाणात porn प्रसारित करित असतातच. प्रश्न असतो स्थिरत्वाचा आत्तापर्यंत आलेल्या कुठल्याही संबंधामध्ये स्थिरत्व नावाची कोणतीही गोष्ट कुणालाच माहित नसते. पहिला संबंध चुकुनच म्हणजे अपघातानेच किंवा कधीतरी जबरदस्तिने ओठवलेला असतो. म्हणजेच काय? कोणत्यातरी कारणाने तो ह्य मोठ्या गोंधळात पडलेला असतो.

काय तर एकतर LTR (Longterm Relatioship) or The Famous One ''One Night Stands''. हे दोनच मार्ग समोर दिसत असतात. बर्याचदा लोक सुरुवातीला तरी LTR भाषा बोलताना दिसतात. मग तेथे बर्याच प्रोफ़ाईलला भेटी देणे. चिक्कार मित्र add करणे असले उद्योग चालू होतात.

एखादी पोर्फ़ाईल आवडते. सुदैवाने त्याने त्याचा एक भन्नाट फ़ोटो लावलेला असतो. तो पाहून हा आधिच कितीवेळा हस्तमैथुन करतो ह्याचे ह्यालाच ठाऊक मग तो सोन्याचा क्षण येतो की ज्या दिवशी तो स्वत्नातला राजकुमार ह्याला चेटवर भेटतो ह्याचा अनंद गगनाला भिडतो. आणि मग सुरुवात होते प्रोफ़ाईलवर लिहिलेल्या सगळ्या डिटेल्सची chatting वर उजळणी. तो आणि हा chat वर एकमेकांला भेटत राहातात, पहिले शरिराची मोजमापे, वये, आणि इतर फ़ालतू बाबी मग, पिच्कर्स, आणि फोन नंबर दिला जातो मग sms होतात. ltr आनि काय सगळ्या शपथा घेतल्या जातात.

मग एखाद दिवशी त्या राजकुमाराकडुन sms येतो,,,,I am alone from today, mom and dad is on tour...मग काय ??? जातात मग हे महाराज तिथे भेट्तात एकमेकाला....दोघांच्या गप्पा ,,, मग लक्षात येते राजकुमार घेतात सुध्दा मग, काय साथिने थोडी थोडि घेतली जाते.. हा cutee थोडासा लाजत थोडासा घाबरत सगळे करतो खरे ...अर्थातच भिति असतेच.. पुढे काय हा ब्लोग आंबट शौक पुरवायला नाहिये ते दोघे मजा करतात बास,, बाकी मला काही लिहिता येत नाही..

पण मग सकाळ होते जोतो आपल्या कामाला आणि रात्रीच्या चुका रात्रीच विसरयाचे असते हे त्या cutee ला आजुन कळालेले नसते....तो समजतो की आपला राजकुमार मिळाला झाले सगळे ..परत काय ...no phone ..no sms....no nothing ...
cuttee ला सगळे समजायला बराच वेळ लागतो.. पण तो समजतो तेव्हा हादरे बसतात......सगळे झुट आहे हा ही त्यातलाच निघाला One night Stander आणि काय??? मग थोडे दिवस दू;ख आणि अश्रू ......हळूहळू सगळे विरुन जाते....एका एका घोटा बरोबर ...नविन काहीतरी मिळतच मग पुन्हा तेच

new profile ==> chatting ==> vital details ==> mob nos ==> sms ==> pics ==> meetings ==> sex ==> new story..... हे दुष्ट चक्र चालुच राहाते ...

Monday, February 9, 2009

''समाजमान्यता''

कधी मिळते आणि का मिळते एखाद्या गोष्टीला मला कोणी सांगेल????
१) मला तर कधीच कळले नाही, हुंडा, सतिप्रथा, बालविवाह, वैश्याव्यवसाय, जातिभेद, वर्णभेद, रुढी-परंपरा आणि काय आणि काय??
ह्याही गोष्टी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर समाजमान्य होत्याच ना, ह्यांना कोण म्हणेल हो चांगल्या?? ज्यांना त्याचा फ़ायदा घेता आला तेच ना?
समाजात प्रत्येक गोष्ट ही अशीच असते, आपण प्रथमपासून गायी गुरे, शेळ्या, उंट, घोडे हे का पाळले?? ह्यांनाच का आपले गुलाम बनवले??
कारण हेच की त्यांचे दौर्बल्य, आपण त्यावर बोट ठेवले आणि त्यांना गुलाम बनवले,, नाहीतर आपल्याला काय वाघीणीचे दूध पचले नसते?की सिहींण?
आपण गुलाम बनवले आपल्याला राज्य गाजविता येईल अश्या प्राण्यांवच, त्याच प्रमाणे समाजात समाजमान्यता अश्यच बाबींना मिळते जी बाब सबळ लोक प्रस्तूत आणि प्रसारित करतात, ज्यांचे संख्याबळ किंवा, समाजातिल प्रस्थापितांमध्ये कमी प्रतिचे स्थान आहे ते लोक आपली बाब समाजमान्य करु शकत नाहीत, जेव्हा संख्या वाढेल अथवा आपण लैंगिक अल्पसंख्यांकांचे बहुसंख्य होऊ तेव्हाच आपल्याला समाजमान्यता मिळेल असे मजला वाटते.

२) समाजधारणेच्या आड येणारी बाब :- खरेच आहे की समाजधारणेस ही बाब समस्या उभी करु शकते परंतु मला सांगा अश्या कित्येक बाबी आहेत की ज्या समाजधारणेस बाधा आणन्यारा बाबी आहेत समाजधारणेस संन्यास, सैनिकी जिवनशैली, वैश्यावृत्ती, अनेक कितीतरी बाधा आणर्यार बाबी आहेत. आपण त्या प्रत्येक व्यक्तिची वैयक्तिक निवड म्हणुन जरी स्विकारल्या तरीही त्यांमुळे त्यांची समाजधारणेस असलेली बाधकता कमी होत नाही.

३) लौटरी सारख्या गोष्टी :- धनप्राप्तिच्या अश्या कितीतरी मार्ग आहेत जे की gain without pain चे स्वप्न दाखवतात . त्यातुन खरेच किती जणांना आर्थिक फ़ायदा होतो हे ज्याचे त्यांनीच पहावे..

४) चेन मार्केटींग :- अरे काय हे स्वत: चुxx बनायचे आणि दुसर्याला बनवाचे की काय? चेन मार्केटींग ह्यांच्या कुणी असले धंदे शोधुन काढले मला माहित नाहि.. आणि त्याला समाज मान्यता मिळते त्यातुन जर कुणी श्रीमंत झाला तर आपण त्याला नावाजतो.
असो ही यादी बरीच मोठी जाऊ शक्ते पण मला तिकडे जायचे नाही आपला मुख्य विषयाकडे वळू अश्याप्रकारे अगदी टाकाऊ अश्या बाबींना आपण समाजात मान्यता मिळताना पाहू शकतो एवढेच नव्हे तर आपण [समाजाने] त्यांना डोक्यावर घेतले आहे.

या विरुध्द आपण समलिंगी संबंधांकडे पाहुयात.
१) हे संबंध पहिली बाब दोघांमध्येच होणार आहेत, जास्तित जास्त एक डझनभर असतील. त्यांतच ह्यांचे काही चेन मार्केटींग करणार नाहीत आणि ते अगदी शांतपणे आपली जिवन शैली जगत आहेत कुणालाही त्याचा त्रास नाही. समाजधारणेचा प्रश्न जिथे येतो तेथे लोकसंख्या कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि जर अश्याप्रकारे आम्हा लोकांनि जर असलेल्या अनाथ मुलांचा प्रश्न दत्तक घेऊन सोडवला. आणि बाकीच्यांनी एक किंवा एकवरच थांबवले तर समाज धारणा किती चांगली होईल??सगळेच प्रश्न सुटतील मुल दत्तक घेतल्याने समलिंगी लोक स्थिर अश्या दिर्घकालीन संबंधाकडे वळतील.. असे मला तरी वाटते. २) समलिंगी संबंधांकडे आपण काही समाजाची भले करणारी बाब म्हणुन पाहाणार नाही परंतू. प्रश्न असा आहे की समाजाचा भाग असलेल्या या घटकाला समाजा मधून बाहेर टाकायचे की समाजात ठेऊन त्यांना सामान्य म्हणुन स्विकारायचे . अर्थातच त्यांना समाजाने स्विकारावे.
३) परंतू जे काही आपण स्विकारतो त्याचा खरे तर पुर्नविचार व्हावा.
४) हे संबंध खर्या अर्थाने एक मानसिक निकड म्हणुन निर्माण होतात, आणि आपण त्याचे आर्थिक फ़ायदा(playboys), गरज म्हणुन(सैन्यदल), मानसिक विकृति(असू शकते), मानसिक/भावनिक गरजांतुन, समलिंगी संबंध निर्माण होतात.

Sunday, February 8, 2009

एक मराठी मुलगा,,
जो कदाचित निसर्गाची चूक,
कदाचित मानसिक आजार,
कदाचित की जसे अमेरिकन मानसशात्रिय संस्था सांगते तसे नैसर्गिक.
असे काही तरी पण भारतात आणि त्यात तथाकथित सभ्य शहर म्हणुन
समजल्या जाणार्या पुण्यात आणि अजुनच सभ्य म्हणजे ब्राह्मण समाजात
जन्माला आला तर त्याने काय आत्महत्येशिवाय काहीही विचार न करावा.???


मला तर कधीही कळलेच नाही हे ,
समलिंगी माणसाने काय करावे असो,,, म्हणून मी नैतिकता आणि समाजमान्यता ह्यावर थोडासा अभ्यास केला त्याचा परिपाक म्हणुन हा लेखन प्रपंच सुरु केला...
12 Steps of Intimacy
by Gloria Liven
Did you know that becoming intimate with someone tends to follow a natural pattern? Knowing this can help you understand and control how your intimacy is progressing.

Desmond Morris, a behavioral scientist, studied many couples and found those that lasted the longest followed similar intimacy patterns, progressing through what he defined as 12 steps. His theory was that proceeding through these steps without being rushed gave a couple time to bond in their relationship. Couples that skipped or rushed steps-- for example, going straight to sex-- were more likely to break up or divorce.

Women especially resent being rushed through the steps. Taking your time to build trust and a bond along with intimacy will help your relationship create a lasting bond.

  • Eye to Body
    This happens every day and is pretty insignificant. You simply look at the other person.
  • Eye to Eye
    You make eye contact-- maybe you are flirting. It's the first real step toward intimacy.
  • Voice to Voice
    You talk to the other person. This can be very important in getting to know someone.
  • Hand to Hand
    You start holding hands-- the relationship has now become more than just friendship.
  • Arm to Shoulder
    Allowing yourself to be this close physically is the beginning of closer intimacy.
  • Arm to Waist
    Your comfort level is beginning to grow.
  • Mouth to Mouth
    You now feel comfortable with kissing the other person.
  • Hand to Head
    This is a sign of trust; your head is very vulnerable and we do not like just anyone touching our heads or faces.
  • Hand to Body
    "Roaming hands"... this is the beginning of foreplay and "making out".
  • Mouth to Breast
    You're comfortable with using your mouth to explore the other person's body, and vice versa.
  • Hand to Genitals
    Not quite sex-- many young couples that aren't ready for sex find this a suitable substitute.
  • Sexual Intercourse
    The final stage-- it doesn't get more intimate.